Home Uncategorized विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम कुर्वे तर द्वितीय एकांशू शर्मा

विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम कुर्वे तर द्वितीय एकांशू शर्मा

114
0

देवरी, (गोंदिया) : देवरी तालुक्यात यावर्षी 12 वीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थीनी घवघवीत यश संपादन केले. यात देवरी येथील श्रीमती के.एस. जैन कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून साक्षात अनिल कुर्वे याने 81.83 टक्के गुण मिळवून विद्यालय व तालुक्यात प्रथम तर एकांशू नंदूप्रसाद शर्मा याने 79.17 टक्के गुण द्वितीय क्रमांक पटकावीला. तसेच मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथील विज्ञान शाखेतील आचल भास्कर बडोले हिने 78.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमाक प्राप्त केले आहे. त्याच प्रमाणे श्रीमती के.एस.जैन कनिष्ठ महाविद्यालयातील भुमिका रविकांत काळे हिने 73.50 टक्के गुण मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवीला आहे. त्याचप्रमाणे मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथील 12 वी च्या विज्ञान शाखेतून आचल भास्कर बडोले हिने 78.50 टक्के गुण मिळवून तालुक्यातून तृतीय क्रमांक तर विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावीला आहे. प्रतिक्षा प्रकाश बिझांडे हिने विद्यालयातून द्वितीय क्रमांक, प्रेरणा सुरेश ईरले हिने 76 टक्के गुण मिळवून तृतीय पटकाविला आहे. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथील 12 वीच्या विज्ञान शाखेतून कु. लिंकू शिवलाल लांजेवार हिने 77.33 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम तर योगेश भुमेश्वर साखरे याने 76.17 टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच तुषार परसराम बागतलवार 75.67 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतील शाळा व्यस्थापन समितीचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.