तिरोडा : तिरोडा रेल्वे चौकी ते तहसील कार्यालय चिरेखनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांना निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे सहन करावा लागतो. त्यामुळे या समस्याची तातडीने दुरुस्त करा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याना केला. तसेच याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार विजय रहांगडाले यांनी दिला. तिरोडा- अर्जुनी रस्त्यावर रेल्वे पुलाचे बांधकाम मागील दोन वर्षापासून महारेल विभागामार्फत सुरु असल्याने या रस्तावरील वाहतूकीला तहसील कार्यालय मार्गे वळणमार्ग दिलेला आहे. परिणामी, अर्जुनी मार्गे होणारी वाहतूक ही तिरोडा तहसील कार्यालय चिरेखनी मार्गाने होत असते. कवलेवाडा रेल्वे चौकी ते झेंडा चौक पर्यंत रस्त्यावर सद्यास्थितीत मोठमोठे खड्डे पडलेले असून या मार्गावर सर्व शासकिय कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करित असतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रस्ता दुरुस्त करण्याबाबत नागरिकांनी आमदार विजय रहांगडाले यांचेकडे तक्रार केली. तक्रार करताच तातडीने आमदार यांनी महारेल विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून सदर रस्ता दुरुस्त केल्याच्या सूचना दिल्या. याबाबत शनिवारला उपविभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम व जिल्हापरिषद, महारेल विभाग व उपविभागीय अधिकारी यांचेसोबत बैठक बोलाविली आहे. जर या बैठकीमध्ये सोमवारपासून काम सुरू केले नाही तर रस्ता बंद इशारा दिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत सर्व विभागाची राहिल, अशी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
Home Uncategorized तिरोडा रेल्वे चौकी ते तहसील कार्यालय चिरेखनी रस्ता तातडीने दुरुस्त करा, अन्यथा...

