Home गोंदिया जिल्हा  निवडणूक पार्श्वभुमीवर देवरी पोलिसांचा रूट मार्च

 निवडणूक पार्श्वभुमीवर देवरी पोलिसांचा रूट मार्च

45
0

मतदान शांततेत पार पाडण्याचे आव्हान

देवरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर  निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पडावी, यासाठी देवरी तालुका पोलिस प्रशासन सज्ज झाले असुन देवरी पोलिस विभागातर्फे शहरात शांततेत मतदान करा-चा नारा देत  १७ मार्च रोजी  देवरी शहरात रुट मार्च काढण्यात आला. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळून असा शेकळो पोलिसांचा फौजफाटा या रुट मार्चमध्ये सहभागी झाला होता.  

लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक शांततेत पार पाडावी, यासाठी देवरी  पोलिस दलाकडून ठोस पावले उचलण्यात आली आहेत. देवरी तालुक्यात  सर्व  अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेऊन निवडणुकीबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. देवरी तालुक्यात रजेवर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना निवडणूक बंदोबस्तासाठी सेवेत पुन्हा बोलाविण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये राखीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस ठाणेस्तरावर लाठी, हेल्मेट, ढाल, अश्रूधूर या साधनांसह प्रत्येक अधिकारी कर्मचार्‍यांना ठेवण्यात आले आहे.

देवरी शहरात रुट मार्च दरम्यान शहरातील प्रत्त्येक चौकात  दंगा काबू योजना राबविण्यात आली असून निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस ठाणे हद्दीत कॉर्नर मीटिंग, पायी गस्त प्रभावीपणे करण्यात आली आहे. तसेच, मतदारसंघांतील पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देवरी पोलिस दलाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस दल सज्ज झाल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी  विवेक पाटील यांच्या कडुन सांगण्यात आले आहे.  देवरी शहरात आयोजीत रुट मार्च वेळी पोलिस विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील , पोलिस निरीक्षक प्रविण डांगे याच्यां उपस्तीतीत शेकडो पोलीस कर्मचारी या रुट मार्च मध्ये सहभागी झाले होते.