रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची मागणी : रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया : जागृती विकास मंच गोंदिया व पूर्व रेल्वे सल्लागार समिती सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासांच्या विविध समस्यांना घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले व या संदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रमुखरित्या इतवारी-गोंदिया लोकल पूर्वीच्या वेळेप्रमाणे चालवण्यात यावी. त्याचप्रमाणे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे संबंधित वेगवेगळ्या स्थानकावरून चालणाऱ्या सुपरफास्ट व एक्सप्रेस दोन्ही गाड्यांमध्ये डबे सामान्य प्रवासांसाठी पण उपलब्ध करण्यात यावे. लोकल ट्रेन गाडी नंबर 08724 गोंदिया ते रायपूर दरम्यान चालणारी गाडी मागील दहा महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. ही गाडी गोंदिया रेल्वे स्थानकावरून सकाळी 7 वाजता निघून दुपारी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी रायपूर येथे पोहचत होती. यामुळे सदर गाडीमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे व्यवसायीक, शिक्षण संबंधित विद्यार्थी व मध्यमवर्गीय नागरिक असल्यामुळें ही गाडी त्याच्यासाठी अत्यंत सोयीस्कर होती. त्याचप्रमाणे इतवारी ते गोंदिया मेमो गाडी नंबर 68714 ही सुद्धा रेल्वे मागील दहा महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे ती देखील पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी. त्याचप्रमाणे दक्षिण पूर्वे रेल्वे संबंधित चालणाऱ्या सुपरफास्ट व एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांमध्ये गाड्यांच्या दोन्ही बाजूला सामान्य अनारक्षित डबे प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. जेणेकरून सामान्य व गरजू प्रवासासाठी प्रवास करणे सोयीस्कर होईल. त्याचप्रमाणे सर्व लोकल व एक्सप्रेस गाड्या वेळेवर चालवण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्य व जागृती मंचच्या सदस्यांकडून करण्यात आली. निवेदन देतेवेळी, छैलबिहारी अग्रवाल, सुरेंद्र शर्मा, सुरज नशिने, दिव्या भगत- पारधी, प्रफुल जयस्वाल, चंद्रप्रकाश गुप्ता उपस्थित होते.

