Home Uncategorized राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.बोरकर सन्मानित

राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.बोरकर सन्मानित

86
0

गोंदिया : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघातर्पेâ 27 व 28 मे रोजी दोन दिवसीय कार्यशाळा व हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोहर म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालय येथील हिंदी प्राध्यापिका दर्शना बोरकर यांना राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.विजयकुमार रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला हिंदी प्राध्यापक संघाचे राज्याध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, प्रा. सुंदर लोंढे, प्रा. क्षमा करंजगावकर, डॉ. राजकुमार कांबळे, प्रा. जावेद शेख, प्रा. सुनिता जमदाडे, प्रा. ज्योती शर्मा व राज्यभरातील हिंदी प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हिंदी भाषेचा प्रचार-प्रसाराकरीता दिलेल्या योगदानाकरीता प्रा.दर्शना बोरकर यांचा राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्तीबद्दल प्रा. दर्शना बोरकर यांचे प्रा. एस.जी. नालमवार, प्रा. एच.एन. जांभुळकर, प्रा. एन.एस. लिल्हारे, प्रा. के.एम. कटरे व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे. यशाचे श्रेय प्रा.डॉ. किशोर वासनिक, प्राचार्य राजा डिसुजा, प्राचार्य रामेंद्र बोरकर यांना दिले आहे.