Home गोंदिया जिल्हा मल्हारबोडी पाड्यात पाणी पेटले

मल्हारबोडी पाड्यात पाणी पेटले

28
0

दोन महिन्यापासून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
देवरी :
तालुक्यातील शेळेपार ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या मल्हारबोडी या आदिवासी बहुल गावात मागील दोन महिन्यापासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच भटकंती करावी लागत आहे. असे असले तरी ग्रामपंचायत प्रशासन मात्र सुस्त आहे.
देवरी तालुक्यातील शेडेपार ग्रामपंचायत अंतर्गत मल्हारबोडी हा पाडा आहे. या पाड्याची लोकसंख्या ़जवळपास १२५ एवढी आहे. या गावात मागील अनेक वर्षापासून पाण्याची समस्या निर्माण होत असते. त्यातच आमदार विकास निधी अंतर्गत एक बोअरवेल खोदण्यात आले. मात्र ती बोअरवेल देखील जानेवारी महिन्यातच निकामी ठरली आहे. यामुळे मल्हारबोडी या गावातील नागरिकांना पाण्याची टंचाई समोर जावे लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच पायपीट करावी लागत आहे. असे असले तरी ग्रामपंचायत प्रशासन मात्र या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. या समस्येसाठी गावकर्‍यांनी कुठे गावे, असा प्रश्न निर्माण होत आहे.