अर्जुनी मोरगांव, (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथील पोल्ट्री फाॅर्ममध्ये 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान अंदाजे 7-8 फुट अजगर साप निघाल्याची खळबळ माजल्याने तेथील एका व्यक्तीने तात्काळ अर्जुनी मोरगांव येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांना माहिती मिळताच सबंधित बोळदे येथील वनरक्षक पडोळे व निमगांवचे वनरक्षक मुनेश्वर यांनी सर्पमित्र राहुल लाडे व आशिष वावरे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवून त्यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यांनी सुरक्षित सापाला पकडून सापाने पोल्ट्री फाॅर्ममधील कोंबडा एका सुतळीने लोखंडी राॅडच्या सहाय्याने बांधण्यात आले. ते लोखंडी राॅड व कोंबडा खाल्ल्याचे निदर्शनास आल्याने वनविभाग अधिकार्यांच्या मदतीने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय अर्जुनी मोरगांव येथे नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपचारादरम्यान सापाच्या पोटातून कोंबडा व लोखंडी राॅड काढण्यात आले. सचिन कटरे वनपरिक्षेत्र अधिकारी अर्जुनी मोरगांव यांच्या समक्ष व बोळदे येथील वनरक्षक पडोळे, निमगांवचे वनरक्षक मुनेश्वर आणि सर्पमित्र राहुल लाडे, आशिष वावरे यांच्या सहकार्याने सोनेगांव जंगल अधिवासात अजगर सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.

