रंग पंचमी खेळा पण सावधगिरी बाळगा !बनावट रंगामुळे त्वचेचे आणि आरोग्याचे होते नुकसान -डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारीगोंदिया- “होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं..” उत्साह, आनंदाचा लयलूट करणारी होळी सर्वांनाच आवडतो. रंग खेळण्यासाठी तर प्रत्येक जण उत्साहाने वाट पाहत असतो. पण भेसळयुक्त अथवा बनावट रंगांमुळे या आनंदाला गालबोट लागू शकतो.होळी खेळताना थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर अडचण निर्माण होऊ शकते. होळीचे रंग हे आपल्या त्वचेला, डोळ्यांना, केसांनाही हानी पोहोचवू शकतात. अशा स्थितीत होळीच्या रंगोत्सवानिमित्त काही काळजी घेणे आवश्यक आहे.आज होळी खेळण्यासाठी रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.होळीच्या या रंगांमध्ये लीड ऑक्साईड, क्रोमियम आयोडाइड, कॉपर, सल्फेट, शिसे आणि अॅल्युमिनियम ब्रोमाइड सारखी रसायने असतात.ज्यामुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.रासायनिक रंगांनी होळी खेळल्यास आरोग्यासाठी मोठे नुकसान होऊ शकतात आणि त्यापासून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे. रंगांमध्ये अनेक प्रकारची केमिकल्स आणि हानिकारक रसायने असल्याने डोळ्यांना आणि त्वचेला अॅलर्जी होणे, श्वसनाचा त्रास, त्वचेवर जखमा, केस कोरडे पडणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत फक्त चांगले आणि नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी म्हटले आहे.रासायनिक रंगांमध्ये विशेषतः सिलिका आणि शिसे मिसळले जाते.हे रंग अगदी थोड्या प्रमाणातही डोळ्यांत गेल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते अशा रंगांमुळे डोळ्यांच्या बाहुल्यांना त्रास होऊ शकतो आणि डोळ्यांना खाज सुटू शकते.रासायनिक रंगांची होळी खेळताना जर ते जास्त प्रमाणात तोंडात गेले तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.ज्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि पोटात संसर्ग यांसारख्या समस्या त्रास देऊ शकतात.रासायनिक होळीचे रंग बनवताना त्यात शिसे, पारा, क्रोमियम आणि अमोनिया यांसारखी घातक रसायने वापरली जातात.अशा परिस्थितीत होळी खेळताना हे रंग चुकून तोंडात गेले किंवा त्वचेत गेले तर शरीरातील विषारीपणा वाढू शकतो.त्यामुळे शरीर कर्करोगासारख्या गंभीर आजारांनाही बळी पडू शकते.याशिवाय अशा रंगांमुळे गरोदर महिला आणि त्यांच्या विकसनशील गर्भालाही धोका निर्माण होऊ शकतो.श्वासोच्छवासाच्या समस्या- होळीच्या रंगांमध्ये पारा, काच, सिलिका यासारखी धोकादायक रसायने मिसळली जातात.ज्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते.याशिवाय या रंगांमुळे श्वसनाचे आजारही वाढू शकतात.त्यामुळे श्वास घेण्यास आणि खोकल्याला त्रास होऊ शकतो.त्वचेशी संबंधित समस्या- रासायनिक रंगांनी होळी खेळल्याने पुरळ, जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा येऊ शकतो.काही लोक रंगांच्या एलर्जीची तक्रार करतात.ज्यामुळे त्वचेवर लहान पुरळ उठतात.बनावट रंगांमुळे त्वचेवर काय पडतो प्रभाव ?लाल रंग- यात पारा-सल्फाइटचे मिश्रण असते. यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. त्याचा त्वचेशी संपर्क टाळा.हिरवा रंग- त्यात कॉपर सल्फेट आढळते, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते, ज्यामुळे दृष्टी प्रभावित होऊ शकते.काळा रंग- यामध्ये लेड-ऑक्साईड मिसळले जाते. जर ते तोंडातून पोटात गेले तर मूत्रपिंडात अनेक समस्या उद्भवू शकतात.निळा रंग- यामध्ये प्यूशिअन ब्लू असतो, त्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो.चमकते रंग-यामध्ये अॅल्युमिनियम ब्रोमाइड असते, त्याच्या वापराने त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते.सिल्व्हर कलर -याच्या वापरानेही त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.हा रंग सहजासहजी निघत नाही.सोनेरी रंग- या रंगाच्या वापरानेही त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.यामुळे होळी खेळताना काळजी घेणे गरजेचे असते.होळीँ खेळताना घ्या ही खबरदारी -डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारीगोंदिया(12 मार्च)- “होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं..” उत्साह, आनंदाचा लयलूट करणारी होळी सर्वांनाच आवडतो. रंग खेळण्यासाठी तर प्रत्येक जण उत्साहाने वाट पाहत असतो. पण भेसळयुक्त अथवा बनावट रंगांमुळे या आनंदाला गालबोट लागू शकतो.होळी खेळताना थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर अडचण निर्माण होऊ शकते. होळीचे रंग हे आपल्या त्वचेला, डोळ्यांना, केसांनाही हानी पोहोचवू शकतात. अशा स्थितीत होळीच्या रंगोत्सवानिमित्त काही काळजी घेणे आवश्यक आहे.आज होळी खेळण्यासाठी रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.होळीच्या या रंगांमध्ये लीड ऑक्साईड, क्रोमियम आयोडाइड, कॉपर, सल्फेट, शिसे आणि अॅल्युमिनियम ब्रोमाइड सारखी रसायने असतात.ज्यामुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.रासायनिक रंगांनी होळी खेळल्यास आरोग्यासाठी मोठे नुकसान होऊ शकतात आणि त्यापासून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे. रंगांमध्ये अनेक प्रकारची केमिकल्स आणि हानिकारक रसायने असल्याने डोळ्यांना आणि त्वचेला अॅलर्जी होणे, श्वसनाचा त्रास, त्वचेवर जखमा, केस कोरडे पडणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत फक्त चांगले आणि नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी म्हटले आहे.रासायनिक रंगांमध्ये विशेषतः सिलिका आणि शिसे मिसळले जाते.हे रंग अगदी थोड्या प्रमाणातही डोळ्यांत गेल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते अशा रंगांमुळे डोळ्यांच्या बाहुल्यांना त्रास होऊ शकतो आणि डोळ्यांना खाज सुटू शकते.रासायनिक रंगांची होळी खेळताना जर ते जास्त प्रमाणात तोंडात गेले तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.ज्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि पोटात संसर्ग यांसारख्या समस्या त्रास देऊ शकतात.रासायनिक होळीचे रंग बनवताना त्यात शिसे, पारा, क्रोमियम आणि अमोनिया यांसारखी घातक रसायने वापरली जातात.अशा परिस्थितीत होळी खेळताना हे रंग चुकून तोंडात गेले किंवा त्वचेत गेले तर शरीरातील विषारीपणा वाढू शकतो.त्यामुळे शरीर कर्करोगासारख्या गंभीर आजारांनाही बळी पडू शकते.याशिवाय अशा रंगांमुळे गरोदर महिला आणि त्यांच्या विकसनशील गर्भालाही धोका निर्माण होऊ शकतो.श्वासोच्छवासाच्या समस्या- होळीच्या रंगांमध्ये पारा, काच, सिलिका यासारखी धोकादायक रसायने मिसळली जातात.ज्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते.याशिवाय या रंगांमुळे श्वसनाचे आजारही वाढू शकतात.त्यामुळे श्वास घेण्यास आणि खोकल्याला त्रास होऊ शकतो.त्वचेशी संबंधित समस्या- रासायनिक रंगांनी होळी खेळल्याने पुरळ, जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा येऊ शकतो.काही लोक रंगांच्या एलर्जीची तक्रार करतात.ज्यामुळे त्वचेवर लहान पुरळ उठतात.बनावट रंगांमुळे त्वचेवर काय पडतो प्रभाव ?लाल रंग- यात पारा-सल्फाइटचे मिश्रण असते. यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. त्याचा त्वचेशी संपर्क टाळा.हिरवा रंग- त्यात कॉपर सल्फेट आढळते, ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते, ज्यामुळे दृष्टी प्रभावित होऊ शकते.काळा रंग- यामध्ये लेड-ऑक्साईड मिसळले जाते. जर ते तोंडातून पोटात गेले तर मूत्रपिंडात अनेक समस्या उद्भवू शकतात.निळा रंग- यामध्ये प्यूशिअन ब्लू असतो, त्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो.चमकते रंग-यामध्ये अॅल्युमिनियम ब्रोमाइड असते, त्याच्या वापराने त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते.सिल्व्हर कलर -याच्या वापरानेही त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.हा रंग सहजासहजी निघत नाही.सोनेरी रंग- या रंगाच्या वापरानेही त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो.यामुळे होळी खेळताना काळजी घेणे गरजेचे असते.होळीँ खेळताना घ्या ही खबरदारी