मल्टीमिडिया प्रदर्शनीचे केले कौतुक
गोंदिया, दि.25 :येथील नवीन प्रशासकीय इमारतीत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाच्या सर्वसाधारण योजनांची तीन दिवसीय चित्रमय मल्टीमिडिया प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे. या प्रदर्शनीला उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी शृती डोंगरे यांनी भेट दिली असता, शासनाच्या सर्वसाधारण योजनांच्या 40 योजनांची चित्रमय स्वरुपात असलेली माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे या प्रदर्शनीला पाहण्यासाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी योजनांच्या या चित्रमय मल्टीमिडिया प्रदर्शनीचे कौतुक केले.
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विभागातील लोककल्याणकारी योजनांची माहिती गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना मल्टीमीडियाच्या माध्यमातून व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 24 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी, नवउद्योजक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देवून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

