गोंदिया : आर्थिक विवंचना व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्याने चोरखमारा जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदय द्रावक घटना तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथे आज 19 एप्रिल रोजी घडली.तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील मुनेश्वर श्रीराम कुंभारे (५०) व पत्नी सरीता मुनेश्वर कुंभारे ( ४५) रा. चोरखमारा असे मृतक शेतकरी दाम्पत्याचे नाव आहे. यांना १० वर्षाची प्रणाली ही मुलगी आहे. तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह जलाशयातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालयात हलवलेे असून तपास सुरु केला आहे.




