Home आरोग्य मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय क्रीडा केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय क्रीडा केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

90
0

  गोंदिया, दि.2 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत “मिशन लक्ष्यवेध योजना” ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत विभागीय क्रीडा निपुणता केंद्र, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग, नागपूर येथे स्थापन करावयाचे आहे. त्यामध्ये तुर्तास अॅथलेटिक्स (मैदानी) व टेबल टेनिस या दोन खेळाची निवड चाचणी प्रस्तावित आहे.

        सदर निवड चाचणीचे प्रभावी आयोजन करण्याचे अनुषंगाने Google Form उपलब्ध करुन देण्यात येत आहे. Google Form मध्ये खेळाडूंनी सर्व माहिती अचूकपणे भरणे अभिप्रेत आहे.

       वरील दोन्ही क्रीडा प्रकारांकरीता खेळाडू (मुले/मुली) वय 31 डिसेंबर 2026 रोजी पर्यंत 25 वर्षे असावे. खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. खेळाडूचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत दोन वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे सहमतीपत्र ही कगदपत्रे आवश्यक आहेत.

        राज्यस्तरावील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच शासन मान्यता प्राप्त डॉक्टर कडून दिलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे. याकरीता अॅथलेटिक्स (मैदानी) व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात पात्र खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी.  

        खेळाडूंना नोंदणी करण्याकरीता https://doc.google.com/forms/d/e/1FAIpQLSfCIRXqvKpyEWTVbLce6OqjeiSxQiAj104Q VMdbwE5qsMgNRw/viewfrom?usp=publish-editor अशी लिंक देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी यांनी केले आहे.

                                                                                 

इतर मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

         गोंदिया, दि.25 : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत प्रवेश प्रक्रियेचे शैक्षणिक सत्र 2025-26 करिता इतर मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतीगृहामध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेंतर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

         शासनाच्या https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर बी.ए.,बी.कॉम.,बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दि.25 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 पर्यंत अर्ज भरून ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी.

         जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वसतिगृह तसेच आधार व स्वयंम योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ओबीसी मुला-मुलींचे वसतीगृह गोंदिया येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गोंदिया यांनी केले आहे.