गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष जिवंत व पुनर्निर्माण करण्याचे काम डाॅ. राजरत्न आंबेडकर यांनी सुरु केले आहे. त्या अनुषंगाने शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी गोंदिया येथील रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनुमते यांनी डाॅ. राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशानुसार गोंदिया जिल्हा अध्यक्ष पदावर प्रफुल्ल भालेराव यांची नियुक्ती केली आहे. लवकरच जिल्हाच्या आठही तालुक्यातील बैठकी घेण्यात येणार आहेत आणि तालुका व जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. बैठकीत प्रामुख्याने राज्य अध्यक्ष दिनेश हनुमते, राज्य महासचिव वैभव धबडगे, राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, पूर्व विदर्भ प्रभारी नीरज ताकसांडे व गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील महिला-पुरुष उपस्थित होते.

