नवेगावबांध, (गोंदिया) : अर्जुनी मोरगांव तालुक्यातील खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बिडटोला या गावाला पाणीपुरवठा केल्या जातो. खूप दिवसापासून टाकीमध्ये भरपूर पाणी भरूनही काही लोकांना पाण्याची अडचण भासत असल्याचे तक्रारी आल्या. त्यामुळे आज, (ता.17) ला सकाळी 7 वाजता सुजल समितीची कर्मचारी व सचिव यांनी बीडटोला या गावात जाऊन चौकशी केली. यात त्यांना गावातील तीन कुटुंबांमध्ये पिल्लू पंप लावून पाईप लाईन मधील पाण्याचा उपसा करत असल्याचे लक्षात आले. त्वरित पंचनामा करून टिल्लू पंप धारकावर कारवाई करत पाच हजार रुपये दंड व पाणीपुरवठा खंडित करण्यात आल. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तालुक्यातील 14 गावांना पाणीपुरवठा केला जातो. सदर 14 गावांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत असताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही नळधारकांना पाण्याची अडचण भासत असल्यास वारंवार तक्रारी उपलब्ध होत होत्या. सदर तक्रारींची निराकरण करण्याकरिता खांबी प्रादेशिक पाणीपुरवठाचा एक शिष्टमंडळ प्रत्येक गावात जाऊन चौकशी करत आहे. अशा परिस्थितीत नळाला तोटी नसणे, पाण्याचा अपव्यय आढळून येणे, एका कुटुंबातून दोन कुटुंबांना पाणी देणे, विनापरवाना पाण्याचा वापर करणे, टिल्लू पंपाचा वापर करणे, नळा जवळ खड्डा खोदून पाण्याचा उपसा करणे, नळाचे कनेक्शन विहिरीत सुरू करणे अशा विविध उपाययोजना करून नळधारक पाण्याचा गैरवापर करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तालुक्यातील खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व गावांमध्ये चौकशी सुरू करून त्याचा पहिला टप्पा बिडटोला या गावांमध्ये आज सर्व नळ धारकांची चौकशी केली. असता तीन कुटुंबांमध्ये पिल्लू पंपाचे साह्याने पाण्याचा उपसा करत असल्याचे लक्षात आले. दरम्यान संस्थेचे सचिव कालिदास पुस्तोडे यांनी त्यांच्यावर पाच हजार रुपये दंड आकारून पाणीपुरवठा खंडित केलेला आहे. त्यामुळे आता बिडटोला या गावातील सर्व नडधारकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे अशी, माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

