पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार? अशी चर्चा गेल्या काही आठवड्यापासून सुरु होती. अखेर भाजपने हा सस्पेन्स संपवून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज (ता. १३) उमेदवारी जाहीर केली. आता मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसमधून कोण निवडणूक लढविणार याकडे लक्ष लागले आहे.

