Home क्रीडा U19 Asia Cup 2023 : आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणारा, कोण...

U19 Asia Cup 2023 : आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणारा, कोण आहे अर्शिन कुलकर्णी? जाणून घ्या

83
0

Who is all-rounder Arshin Kulkarni : अंडर-१९ आशिया कप २०२३ च्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताकडून अष्टपैलू अर्शिन कुलकर्णीने चमकदार कामगिरी केली. त्याने ७० धावांची नाबाद खेळी करत ३ बळी घेतले. या खेळीमुळे अर्शिनने पहिल्याच सामन्यात आपल्या कुटुंबाचा संघर्ष आणि त्याग सार्थ ठरवण्यासाठी पहिले पाऊल टाकले. मात्र, त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. डॉक्टरांच्या कुटुंबातून असलेल्या अर्शिनला संपूर्ण कुटुंब क्रिकेटर बनवण्यात गुंतले होते. त्याला आजीने खूप साथ दिली.

कुलकर्णी कुटुंबात डॉक्टरांचा भरणा आहे, पण सोलापूरचे बालरोगतज्ज्ञ अतुल यांना त्यांचा सर्वात धाकटा मुलगा अर्शिन याने डॉक्टरऐवजी क्रिकेटर व्हावे, अशी इच्छा होती. कारण त्यांनाही क्रिकेटची आवड होती. त्यामुळे आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्याचे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न होते. अतुल कुलकर्णी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, “माझ्या मुलीसह माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण डॉक्टर आहे.” मी क्रिकेट खेळायचो आणि अर्शीनचे आजोबाही क्रिकेट खेळायचे, असे अतुल यांनी सांगितले. सध्या ते अर्शीनच्या कामगिरीने खूप खूश आहेत.