Home आरोग्य पक्ष्यांकरिता जलपात्रांची व्यवस्था

पक्ष्यांकरिता जलपात्रांची व्यवस्था

2
0

अर्जुनी मोरगाव :
वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी मोरगाव येथे पक्ष्यांकरिता जलपात्र लटकविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम महाविद्यालय परिसरात पार पडला.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. अजय राऊत आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. द्वारपाल चौधरी तसेच रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ आशिष कावडे यांनी महाविद्यालय परिसरातील विविध ठिकाणी जलपात्र लटकवून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. या वेळी आय क्यू ए सी समन्वयक डॉ लक्ष्मीकांत कापगते, प्रा. तेजराम चान्देवार व कु. दिशा निखारे (बी. एस्सी सेम. 6) उपस्थित होते. उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीने अशी व्यवस्था करण्यात येत असते. तसेच पक्ष्यांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी कृत्रिम घरटे (नेस्ट बॉक्स) तयार करून लावण्याचेही कार्य महाविद्यालय परिसरात करण्यात आले आहे. या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी तसेच परिसरात पक्ष्यांसाठी जलपात्र उपलब्ध करून निसर्गाबाबत आपले कर्तव्य पार पाडावे, अशी जाणीव महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे.