गोंदिया, ता. १५ : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये सुप्रसिध्द सिने अभिनेता श्री संदीप पाठक मंगळवारी (ता. १७) भेट देवून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध, सडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा जमी., सालेकसा तालुक्यातील भजेपार आणि गोंदिया तालुक्यातील गंगाझरी या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. संबंधित तालुक्यातील नागरीकांनी यावेळी उपस्थीत राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मधुकर वासनिक यांनी केले आहे.
संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना सुमारे सहा कोटी रुपयांपर्यंत पुरस्कार मिळविता येवू शकतील. दरम्यान अभियानात नागरीकांचा सहभाग वाढावा, जनजागृती व्हावी, यासाठी विविध उपक्रमासह ‘सेलिब्रेटी’ भेट कार्यक्रमाचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सिने अभिनेता संदीप पाठक यांच्या ग्रामपंचायत भेटीच्या निमीत्ताने ग्रामपंचायत सिरेगाव बांध येथे अर्जूनी मोरगाव व सडक अर्जुनी, ग्रामपंचायत भजेपार येथे पंचायत समिती सालेकसा, आमगाव व देवरी तर ग्रामपंचायत गंगाझरी येथे पंचायत समिती गोंदिया, तिरोडा, गोरेगाव येथील ग्रामपंचायतींचे सरपंच यांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत श्री. संदीप पाठक सरपंचांशी संवाद साधून मार्गदर्शन करतील. दरम्यान ते गावात राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमाच्या स्थळाला भेटी देवून पाहणी करतील. सेलिब्रेटी भेटीच्या अनुषंगाने गावात आरोग्य शिबीर, कर आकारणी शिबीर, वृक्षारोपण, लोकवर्गणी शिबीर असे विविध उपक्रमाच्या आयोजनाचे निर्देश देण्यात आले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मधुकर वासनिक यांनी सांगितले आहे.
Home मनोरंजन सिने अभिनेता संदीप पाठक यांची ग्रामपंचायतींना भेटमुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान : चार...



