Home क्रीडा आदिवासी विकास विभागातील देवरी प्रकल्पांतर्गत अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेला सुरुवात

आदिवासी विकास विभागातील देवरी प्रकल्पांतर्गत अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेला सुरुवात

44
0

देवरी,
आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार आयुक्तालय नाशिक यांच्या पत्रकान्वये देवरी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह व कार्यालयीन अधिकारी कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्या हस्ते बुधदार (ता. 7/3/2026 )रोजी तालुका क्रीडा संकुल देवरी येथे झाले,
या क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवसी कॅरम व बॅडमिंटन, बुद्धिबळ हे खेळ स्त्री व पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.सर्वच प्रकारच्या वैयक्तिक व सांघिक स्पर्धा झाल्या असून वैयक्तिक व सांघिक खेळातील विजेते अप्पर आयुक्त स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी पात्र होणार आहेत ,या स्पर्धेत स्त्री व पुरुष अधिकारी कर्मचारी सहभागी झालेले असून दोन्ही गटांमध्ये वैयक्तिक खेळात बॅडमिंटन,कॅरम, बुद्धिबळ, धावणे, भालाफेक,गोळा फेक, तबकडीत फेक व इतर खेळ तसेच सांघिक खेळामध्ये कबड्डी,खो-खो, व्हॉलीबॉल,फुटबॉल, हँडबॉल,क्रिकेट व इतर खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या संपूर्ण खेळाचे आयोजन प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी शासनाच्या निर्देशानुसार केलेले असून यात सहायक प्रकल्प अधिकारी डॉ.सायली चिखलीकर,टी टी बघाडे,कपिल शर्मा, सहाय्यक लेखाधिकारी निलेश राठोड,भांडारपाल संघरत्न नागदेवे, वरीष्ठ लिपिक चित्रांगद हटवार, प्राचार्य कमल कापसे, अशोक ईस्कापे, गोवर्धन खेडकर, संजय गोटमवार, तसेच सर्व गृहपाल, अधिक्षक अधिक्षिका इतर सर्व कार्यालयीन कर्मचारी,क्रीडा शिक्षक यांच्या सहकार्याने स्पर्धा संपन्न झाली.

बाईट
वर्षभर अधिकारी व कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असतात त्यांच्यातील कामाचा ताण कमी करण्यासाठी व नवीन जोमाने,नवचैतन्य निर्माण करण्यासाठी व त्यांच्यातील खेळाडू वृत्तीला वाव मिळण्यासाठी शासनाने घेतलेला अभिनव उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.—————
प्रकल्प अधिकारी उमेश काशीद प्रकल्प कार्यालय देवरी.