Home Uncategorized आर ओ आर मुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर विलंबाची समस्या सुटणार.

आर ओ आर मुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर विलंबाची समस्या सुटणार.

15
0

माजी खासदार सुनिल मेंढे यांच्या कार्यकाळात झाली होती कामाला सुरुवात.

गोंदिया: गोंदिया रेल्वे स्थानकावर सततची खोळंबणारी रेल्वे वाहतूक, परिणामी गाड्यांना होणारा विलंब आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप, यामधून आता प्रवाशांची सुटका होणार असून माजी खासदार सुनील मेंढे यांनी वारंवार पाठलाग करून व विशेष लक्ष देऊन केलेला रेल ओव्हर रेल उड्डाणपूल आता पूर्णत्वास जात आहे. पुढील महिनाभरात यावरून वाहतूक सुरु होऊन प्रवाशांना होणारा त्रास दूर होणार आहे.
गोंदिया रेल्वे स्थानक जंक्शन असल्याने तेथे मुंबई हावडा आणि चंद्रपूर जबलपूर अशा दोन्ही दिशांना जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची सतत रेलचेल असते. मात्र रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर येताना वारंवार ट्रॅक बदलावी लागत असल्याने अनेकदा चंद्रपूर जबलपूरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या र…