“आमदार चषक” जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
अर्जुनी/मोर (प्रतिनिधी):
तालुका क्रीडा संकुल, अर्जुनी/मोर येथे आयोजित “आमदार चषक” जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 2025-26 चा पारितोषिक वितरण सोहळा 22 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्ह्यातील तब्बल 284 खेळाडूंनी विविध वयोगटांत सहभाग नोंदवत स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.
या भव्य स्पर्धेचे उद्घाटन 20 मार्च रोजी माननीय आमदार राजकुमारजी बडोले यांच्या हस्ते झाले होते. समारोप प्रसंगी विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार व भाजप जिल्हा सचिव जयंतजी शुक्ला होते. यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मोठी स्वप्नं बघण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्यासाठी दृढ आत्मविश्वास व सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असतात; तेव्हाच यश मिळते.”
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित योग प्रचारक दादाजी फुंडे यांनी खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक संतुलन राखण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयजी कापगते, भाजपा युवामोर्चा जिल्हा सचिव अश्विनसिंह गौतम, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सुधांशु मेहता, सामाजिक कार्यकर्ता निखिल नाकाडे, युथ इन ऍक्शन संघटना सरचिटणीस नयन रुखमोडे, सुनिल पवार, धनराज आहुजा, किशोर राठोड, नितुताई पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी वनवे मॅडम यांनी प्रभावीपणे केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डॉ. महेंद्र हेमणे, क्रीडा प्रशिक्षक थानेद्रसिंह पवार, रेफरी युवराज वाघमारे, क्रीडा शिक्षक पुरुषोत्तम घाटोळे, तसेच माधुरी वानवे, पार्थ तवाडे, किशोर तवाडे, शैलेंद्र फुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली असून, जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





