11 अंगणवाड्यांच्या एकूण 213 बालकांना गणवशाचे वाटप
नवेगावबांध, (गोंदिया) : तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव व महसूल मंडळ कार्यालय नवेगावबांध यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामपंचायत सभागृहात सोमवार, 12 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत महाराजस्व अभियानाचा बाराव्या दिवशी एक हात मदतीचा या कार्यक्रमांतर्गत नवेगावबांध येथील 11 अंगणवाड्यांच्या एकुण 213 बालक- बालिकांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.नवेगावबांध येथील मान्यवरांच्या सहयोग राशीमधून अंगणवाडी बालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौंदड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम हे होते. याप्रसंगी पाहुणे म्हणून अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार खुशाल कावळे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाबुराव यावलकर, मंडळ अधिकारी यु.एस. वाघधरे, नवेगावबांधचे सरपंच हिराताई पंधरे, तलाठी भगवान बी. नंदागवळी, तलाठी एस.एस. चचाने, उपसरपंच रमण डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य बबलु जैन, नवेगावबाध फाउंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, सचिव रामदास बोरकर, माजी सुभेदार नीलमचंद पंधरे, पितांबर काशीवार, सुनिल सांगोळकर, आनंद काशीवार, दीपक राऊत, विजय कुंभरे, पुजा कापगते, दुर्गा शहारे उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अंगणवाडीतील बालकांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला येथील सर्व 11 ही अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस, बालक, बालिकांचे पालक कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते.

