Home Uncategorized जुगार अड्डयावर पोलिसांची धाड; जुगार खेळणाऱ्या सहा जणाना अटक

जुगार अड्डयावर पोलिसांची धाड; जुगार खेळणाऱ्या सहा जणाना अटक

38
0

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 11 ऑगस्ट रोजी कोहका-सेजगाव जंगल शिवारात टाकून तासपत्त्यांवर जुगार खेळणार्‍या 6 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सायंकाळी 6 वाजता कोहका-सेजगाव जंगल शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली. या कारवाई घटनास्थळावरुन 14 हजार 200 रुपये रोख, 2 मोबाईल व ताडपत्री असा 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणारे निकेश उर्फ लाला रामदास ब्राम्हणकर (32, रा. सुंदरनगर), शुभम रामचंद्र बागडे (23 रा. सुंदरनगर), प्रवेश नरेंद्र मेश्राम (24 रा. कुडवा), सुमित जयंत रामटेके (26 रा. कृष्णपुरा वार्ड), विकेश शिवनाथ मालाधरी (36, रा. रामनगर) व सुरेंद्र धुरन रणगिरे (30 रा. मुंडीपार) ताब्यात घेण्यात आले असून नमूद आरोपींविरोधात गंगाझरी पोलिस ठाण्यात येथे कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे पो.नि. दिनेश लबडे, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात पो.हवा. सोमेंद्र तुरकर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, पो.शि. दुर्गेश पाटील यांनी केली.