अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी महांगाव हे मोठे गांव आहे. सभोवतालच्या दहा बारा खेडेगावची बाजारपेठ महागाव आहे. अनेक खेडेगावची रस्ते महांगाव ला जोडण्यात आली आहे. मात्र त्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असुन वाहने तर सोडा पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे. सदर रस्ते सुरळीत रहदारीसाठी त्वरीत दुरुस्त करावे असी मागणी महांगाव सहीत सभोवतालच्या नागरिकांनी काली आहे. याबाबत महागाव व परीसरातील नागरिकांनी या परीसरांतील रोडरस्त्यांची माहीती कथन केली.त्यामधे महांगाव सभोवतालच्या अत्यंत खराब रस्त्यांची बोलके चित्र सुध्दा दाखविली. यामधे महांगाव/सिरोली, माहुरकुडा -निलज- मोरगांव ते अर्जुनी मोर. ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांवरून साकोली आगाराच्या एस.टी.बसेस धावत असतात. बसचालकांना सुध्दा बस चालविणे व मार्ग शोधुन काढने कठीन झाले आहे. त्याचप्रमाणे महांगाव-बोरी-मांडोखाल-अरुणनगर टिपाईंट, महागात-बंध्या-बुटाई, तसेच महांगाव-मुख्य चौक ते खामखुरा मार्ग अत्यंत खराब झाला आहे. नेहमीच बारमाही रहदारी साठी असलेले हे रस्ते आज पायी चालण्यासाठी ही बरोबर नाही. याबाबत परिसरातील नागरिकांनी ह्या रस्ते दुरुस्ती संदर्भात अधिकारी व लोकप्रतिनिधी कडे मागणी केल्याचे समजते. मात्र अजुनही कुणीच लक्ष दिले नसल्याची माहीती नागरिकांनी दिली आहे.

