गोंदिया : खासगी शाळा सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बहुउदेशीय संस्थेचे जिल्हा अधिवेशन रविवार, 11 ऑगस्ट 2024 रोजी शहरातील ग्रीन लँड लान्समध्ये होणार आहे. या अधिवेशनाला जिल्हा कोषागार अधिकारी चं. रा. आंबोळे, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी महेंद्र गजभिये, सनदी लेखापाल राजेश चतुर व संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पारधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनात वार्षिक जमा ख़र्च, सामाजिक कार्य, सेवा निवृत्तीनंतरच्या समस्या, नवीन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संघटनेचे सभासदत्व देणे आदी विषयावर चर्चा होईल. जिल्ह्यातील खासगी शाळेतील सेवानिवृत्त संघटनेच्या सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सचिव आनंद बिसेन यांनी केले आहे.
