Home Uncategorized जलतरण स्पर्धेत यथार्थ राज्यात प्रथम

जलतरण स्पर्धेत यथार्थ राज्यात प्रथम

64
0

गोंदिया : राज्यस्तरीय सब ज्युनियर जलतरण स्पर्धेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंदियाच्या यथार्थ महेंद्र संग्रामे (वय 11) याने उत्कृष्ट प्रदर्शन करून विजेतेपद पटकावित राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. पुणे येथे टिळक जलतरण तलावात महाराष्ट्र अ‍ॅथेलिटिक संघटनेच्या वतीने 19 ते 21 जुलै दरम्यान ज्युनियर जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंदियाच्या यथार्थ महेंद्र संग्रामे याने सहभाग घेतला. दरम्यान स्पर्धेत 5 प्रकारात सहभाग घेवून 4 सुवर्ण पदक व 1 रजत पदक पटकाविले. भरीव कामगिरीमुळे यथार्थ राज्यात अव्वल ठरला आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे. राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अव्वल ठरल्याने गोंदियाचा यथार्थ संग्रामे हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यथार्थ हा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याचा यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी, राज्य स्विमींग संघटनेचे चेतन मानकर यांनी अभिनंदन केले आहे.