गोंदिया : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फाडले. याच्या निषेधार्थ आज, 30 मे रोजी भाजपतर्फे आक्रमक भूमिका घेत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.आ. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडले होते. याविरोधात आज गुरुवारी आक्रमक भूमिका घेत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौकात जमा होऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तसेच आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध करुन त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर आव्हाडांच्या पोस्टरवर जोडे, चप्पलाने मारीत निषेध नोंदविला. अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत डोंगरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्हा महामंत्री सुनील केलनका, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुळकर्णी, जे. डी. जगनीत, गोंदिया ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, शहर अध्यक्ष अमित झा, नरेंद्र तुरकर, धर्मिष्ठा सेंगर, शालिनी डोंगरे, मिलिंद बागडे, बाबूलाल पंचभाई, श्रीकांत चांदूरकर, संजू माने, रतन वासनिक, अक्षय वासनिक, किशोर मेश्राम, राकेश अग्रवाल, अर्चना मडावी, गोल्डी गावंडे, सुनील तिवारी, मधू खरोले, मनोज पटनायक, अशोक जयसिंघानी, मनीष पोपट, मयूर शहारे, धनंजय रिनाईत, गुड्डू चांदवानी, शंभुशरणसिंह ठाकूर, पुरुषोत्तम ठाकरे, रितेश चोरले, बाबा बिसेन, मंगलेश गिरी आदी उपस्थित होते.

