महागाव/सिरोली:
स्थानिक सिरोली (महागाव) येथे शनिवार, २१ मार्च रोजी विविध सेवा सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप मस्के, सचिव चेतन उपरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याला संस्थेचे सदस्य माधव मस्के, शिवदास मस्के, राजन डोंगरे, विलास रामटेके, रामदास वघारे, राजाराम पंधरे, प्रभाकर लंजे, अहिल्याबाई गौतम, अनिल मस्के, उमाकांत ढेंगे, केली लैलैश्वर शिवणकर, होमराज पुस्तोडे, गजानन डोंगरवार यांच्यासह गावातील नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ही नवीन इमारत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.







