Home गोंदिया जिल्हा गुढीपाडवा शोभायात्रेने अर्जुनी नगरी दुमदुमली (जिल्हा रामानंद संप्रदायाकडून भव्य दिव्य शोभायात्रेचे...

गुढीपाडवा शोभायात्रेने अर्जुनी नगरी दुमदुमली (जिल्हा रामानंद संप्रदायाकडून भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन )

12
0

अर्जुनी दिनांक 20 मार्च गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक, वसंत ऋतुच्या पहिला दिवस, चैत्र प्रतिपदा, रावण वदानंतर प्रभू श्रीरामाचे अयोध्या येते प्रथम नगरागमन झाल्याच्या शुभ दिवस. हिंदू संस्कृतीच्या इतिहास व वारसा भावी पिढीने जोपासण्यासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून संपूर्ण राज्यभर आणि देशातील विविध भागात भव्य दिव्य शोभायात्रेने गुढीपाडवा महोत्सव साजरा केला गेला. अर्जुनी येथील मडावी लॉन येथे साडेआठ वाजता प्रतिमा पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रस्थानी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जनजागृती फलक व भगवा भगवाध्वज उंचावत सांप्रदायिक गुरुसेवक पुढे होते. सांप्रदायिक गणवेशात युवा पिढी डोक्याला फेटा बांधून जयघोष करीत होती. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सामाजिक उपक्रमाचे माहिती फलक लावले होते. निशानधारी महिला पुरुष, लेझीम पथक, डोक्यावर मांगल्याचे कलस, गुढीधारी महिला पुरुष भक्ती गीत गायन करीत तल्लीन झाले होते. मराठमोळ्या गणवेशात बालगोपाला सह महिला पुरुष मंडळी नटून थटून शोभायात्रेत शोभावाढवीत होते. शोभायात्रेमध्ये अयोध्या येथील रामलाला चित्ररथात साकारले होते. क्रांतिवीर बिरसा मुंडा, राम दरबार, भरत मिलन, कृष्ण सुदामा भेट, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई आश्वारूढ झाल्याल्या भूमिका साकारण्यात आल्या. ही शोभायात्रा मडावी लॉन ते कोहळी मोहल्ला, दुर्गा चौक, रेल्वे स्टेशन, एस एस जे कॉलेज मार्गे अंदाजे तीन किलोमीटर शोभायात्रा पूर्वनियोजित स्थळी पूर्णत्वास आली. जिल्ह्यात दहा वर्षापासून रामानंद संप्रदायाच्या वतीने गुढीपाडवा महोत्सव शोभायात्रा काढून साजरा केला जातो. शोभायात्रेत जवळपास 2000 भाविक उपस्थित होते, मार्गात स्वच्छता अभियान, वाहतूक व्यवस्था, शितल पेयजल,अल्पोपहार अशी व्यवस्था करण्यात आली होती, शोभा यात्रेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले तर देखावे सादर करणाऱ्या कलाकारांच्या संप्रदायाकडून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.