Home गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त तालुक्यात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तरची एस-13 ऐवजी...

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त तालुक्यात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तरची एस-13 ऐवजी एस-14 वेतनश्रेणी लागू-जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची घोषणा :

14
0

जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना होणार लाभ अर्जुनी मोरगाव : आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कर्मचाऱ्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ६ ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार सुमारे 24 वर्षापासून प्रलंबित असलेली गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना एकस्तरची एस-13 ऐवजी एस-14 वेतनश्रेणी लागू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामभाऊ भेंडारकर यांनी केली. सडक अर्जुनी शिक्षक संघ व शिक्षक संघ महिला शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अध्यक्षस्थानावरून कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष भेंडारकर यांनी पुढे बोलताना सांगितले की,29 फेब्रुवारी 2024 च्या शासन शुद्धीपत्रकानुसार एकस्तर एस-13 ऐवजी एस-14 वेतनश्रेणी लागू करण्यात येत आहे. सुमारे 24 वर्षापासून प्रलंबित असलेल्या या निर्णयामुळे विशेषतः नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शिक्षकांना हि वेतनश्रेणी लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत शिक्षक संघाच्या प्रयत्नांचेही यावेळी कौतुक केले दरम्यान, या निर्णयाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामभाऊ भेंडारकर यांचे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेही शिक्षक संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिक्षक संघ नेहमी नेहमीच पुढे आहे, यापूर्वी शिक्षक संघाच्या वतीने एकस्तरच्या बाबतीत उद्भवलेल्या जटील समस्येचे निराकरण शिक्षक संघातून करण्यात आले आहे, हे सर्व गोंदिया जिल्ह्यातील सामान्य-शिक्षकांची शिक्षक संघावर असलेली निष्ठा व विश्वासामुळे शक्य होत आहे. असे आपल्या मनोगतामधून जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी सांगितले. या गुणगौरव सोहळ्याचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राहुल कोंतमवार व करुणा हटकर यांनी मांडले सूत्रसंचालन सत्यवान गजभिये व सुरेश आमले यांनी केले,आभार अंजली शिवणकर व श्यामा कुंडगीर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.