Home आरोग्य व्यावसायीक ठिकाणी केलेल्या धाडी सत्रात,15 घरगुती गॅस जप्त ; एकावर गुन्हा दाखल

व्यावसायीक ठिकाणी केलेल्या धाडी सत्रात,15 घरगुती गॅस जप्त ; एकावर गुन्हा दाखल

38
0

  गोंदिया, दि.12 : सद्यस्थितीत युध्द परिस्थिती लक्षात घेता, घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अवैध वापर रोखण्याकरीता जिल्हा स्तरावर दक्षता/फिरते पथक स्थापन करून जिल्ह्यातील आठही तालुक्यात व्यावसायीक ठिकाणी म्हणजे कॅटरींग, हॉटेल्स, मंगल कार्यालय, बेकरी, दवाखाने इत्यादी ठिकाणी धाडसत्र सुरु करण्यात आले आहे.

          जिल्ह्यातील आठ तालुक्यात एकूण 21 गॅस एजन्सी आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील 1 व तिरोडा तालुक्यातील 5 अशा एकूण 6 व्यावसायीक ठिकाणी फिरते पथकाने धाडी टाकल्या असता गोंदिया तालुक्यातील 7 व तिरोडा तालुक्यातील 8 असे एकूण 15 घरगुती गॅस जप्त करण्यात आले. यामध्ये तिरोडा तालुक्यात एका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.