दि. 28 फेब्रुवारी रोजी देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदीर चिल्हाटी येथे टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत निक्षय शिबीर संपन्न झाले.निक्षय शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी रामटेके व डॉ.वसीम सैय्यद यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
डॉ.पल्लवी रामटेके यांनी भारत सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत टिबी वर मात करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाजातुन टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.त्या दृष्टीने जिल्हयामध्ये टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिम राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत नविन क्षयरुग्णांचे शोध मोहिम राबवुन मोफत औषधोपचार देण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार थुंकीद्वारे एका रुग्णापासुन दुस-याला होत असतो.क्षयरोग हा मायक्रोबॅक्टोरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत निक्षय शिबीर घेण्यात येत असल्याचे सांगितले.
या मोहिमेत निक्षय शिबिराद्वारे कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येत असुन त्यामध्ये २ आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पुर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासीत, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषीत व्यक्ती, ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी अंती निदान झालेल्या संशयित रुग्णांचे मोफत एक्स-रे/ थुंकी नमुने तपासण्यात येत असल्याचे सांगितले.
आयुष्मान आरोग्य मंदीर चिल्हाटी येथील निक्षय शिबीरा दरम्यान कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या सहव्याधी लोकांची आरोग्य तपासणी सोबतच 102 लोकांचे निक्षय वाहन द्वारे मोफत एक्स-रे तपासण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.वसीम सैय्यद यांनी याप्रसंगी दिली आहे.
सदर निक्षय शिबीरात तालुका क्षयरोग पर्यवेक्षक संजय भगवतकर,आरोग्य सहायक भरणे,समुदाय आरोग्य अधिकारी आर.पी.म्हस्के,आरोग्य सेविका एस.एन.मेश्राम व ए.गणवीर, गटप्रवर्तक डोंगरे यांचे सह कार्यक्षेत्रातील आशा सेविका तसेच सोबत गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







