Home Uncategorized लस म्हणजे कवचकुंडलेबालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन

लस म्हणजे कवचकुंडलेबालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन

21
0


बाळाला जन्मतः पंचःसुत्री लसीकरण देवुन कवच कुंडले प्रदान करा……
बाळाला जन्मतः स्तनपान व बिसीजी,पोलिओ,हिपॅटायटीस-बी, व्हिटँमिन-के चे पंचःसुत्री लसीकरण देवुन रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण करतात…
                                      -प्रजित नायर, जिल्हाधिकारी

राष्ट्रीय लसीकरण दिन हा एक देशव्यापी आरोग्य सेवा कार्यक्रम आहे, जो दरवर्षी १६ मार्च रोजी साजरा केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.खरं तर लसीकरण हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी महत्वाचे आणि गरजेचे आहे.या राष्ट्रीय लसीकरण दिनाची सुरूवात जरी लहान मुलांच्या लसीकरणाने झाली असली तरी, याचे महत्व सर्व वयोगटातील लोकांना समजणे आणि त्यांनी ते समजून घेणे गरजेचे आहे.देशात या लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. लस ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण, लसीकरणामुळे आपले अनेक धोकादायक आजारांपासून संरक्षण होत असल्याची माहीती प्रजित नायर यांनी याप्रसंगी केले आहे.
लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे.सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते.त्यामुळे आरोग्य विभागामार्फत प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येत असते.गावपातळीवरील अतिजोखमीचे गाव,पाडे,विटाभट्टी,जंगलव्याप्त गावात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येत असतात तसेच बालकांना सरंक्षित करण्यात येवुन आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या एकत्रित सहकार्याने कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात येत असते.
     १६ मार्च १९९५ मध्ये देशात पहिल्यांदाच तोंडातून पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.विशेष म्हणजे याच दिवशी सरकारने भारत देश पोलिओमुक्त करण्यासाठी पल्स पोलिओ मोहिम सुरू केली.या पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ या वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओच्या विरोधात लढण्यासाठी दोन थेंब तोंडातून देण्यात आले.ही मोहिम नंतर यशस्वीपणे पार पडली.त्यानंतर, २०१४ मध्ये भारत पोलिओमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आला असलाची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी दिली आहे.
लोकांनी जबाबदारीने आपले बालकांचे संपुर्ण लसीकरण शासकिय रुग़्णालयात करुन आपल्या बालकास कुपोषण व गंभीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणारे प्रतिकार शक्ती निर्माण करावे.नागरिकांनी बालकास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन मोफत लसीकरण करुन घ्यावे.तसेच बाळाला जन्मतः स्तनपान व बिसीजी,पोलिओ,हिपॅटायटीस-बी,व्हिटँमिन-केचे पंचःसुत्री लसीकरण देवुन कवच कुंडले प्रदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अमरिश मोहबे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी या प्रसंगी केले.
जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी,हिपॅटायटीस-बी,पोलिओ,पेंटाव्हँलंट, रोटा व्हायरस,पीसीव्ही,आयपीव्ही,गोवर-रुबेला,जेई,डिपीटी,व्हिटँमिन-अ डोज ई.विविध लसीकरण मोफत दिले जात आहे.जिल्ह्यात नियमित लसीकरण अंतर्गत गावनिहाय लसीकरण सत्रे आयोजित करुन बालकांना लसिकरण करण्यात येत आहे.जागृत राहुन पालकांनी आपल्या बालकास वयोगटातील सर्व लसीकरण करुन बालकाच्या शरीरात विविध आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण करावी तसेच कुपोषण व बालमृत्यु रोखण्यासाठी नियमित लसीकरण वेळेत करण्याचे या प्रसंगि म्हटले आहे.
     जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी प्रसूती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस-बी लसीकरण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर बाळाला हे लसीकरण देण्यात येत असुन खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसूती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण सुद्धा अवश्य करुन घेण्याचे सांगितले.

लसीकरणाचे काही फायदे येथे आहेत:

  • लोकसंख्येमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.
  • हे विशिष्ट विषाणू किंवा बॅक्टेरियांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे उद्रेक आणि साथीचा धोका कमी होतो.
  • लसीकरण लोकांचे, विशेषतः जे असुरक्षित आहेत, जसे की लहान मुले, वृद्ध लोक आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांचे संरक्षण करते.
  • हे समूहातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामध्ये बरेच लोक रोगप्रतिकारक असतात, ज्यामुळे लसीकरण न होणाऱ्या व्यक्तींना अप्रत्यक्ष संरक्षण मिळते.
  • लसीकरण हा एक स्वस्त सार्वजनिक आरोग्य उपाय आहे जो जीव वाचवतो आणि संसर्गजन्य रोगांमुळे होणारे दीर्घकालीन आरोग्य परिणाम टाळतो.