Home Uncategorized
17
0

सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

देवरी,ता.१०: स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. दिनांक ८ मार्च २०२५ रोजी विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एम. तरोणे सर, प्रभारी प्राचार्य तसेच प्रमुख अतीथी म्हणून कु. जे. के. भेलावे मॅडम, विभागप्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी, कु. व्ही. जी. दिवाने मॅडम, आर. एल. मेश्राम सर, एकेडमिक इन्चार्ज, आर. एस. नंदनवार सर, विभागप्रमुख, संगणक अभियांत्रिकी व एम. जी. हिरवानी सर, विभागप्रमुख अणुविद्युत अभियांत्रिकी व विद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक, महिला शिक्षकेत्तर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील मुलींनी क्रांतीज्योती सावि…

छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिन साजरा

देवरी,ता.१०::-स्थानिक छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे दिनांक ०८ मार्च २०२५ रोज शनिवारला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्री. उपदेश लाडे सर, प्राचार्य हे होते तसेच प्रमुख अतीथी म्हणून मा. कु. शाजिया पठाण, एच.ओ.डी. छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी व डी. फार्मसी) येथील सर्व महीला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतीथींनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. शाजिया पठाण मॅडम, संचालन कु. स्वाती टेंभुर्णे मॅडम तसेच उपस्थितांचे आभार कु. रिता सोयाम यांनी मानले. एकंदरीत या कार्यक्रमाल…

छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे “जागतिक महिला दिन” साजरा

देवरी,ता.१०: देवरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे दिनांक ०८/०३/०२५ रोज शनिवारला” जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. जी. भुरे सर प्राचार्य हे होते, तर प्रमुख अतिथी कु. मते मॅडम, कु. गेडाम मॅडम,कु. येरणे मॅडम,कु. येटरे मॅडम या होत्या.
यावेळी प्रथमतः विद्यादायनी माॅं शारदा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गीत व भाषणातून महिला दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी यांनी आजची महिलांची स्थिती व महिलांची प्रगती याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांन…

पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवरी या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा.

देवरी,ता.१०: दिनांक आठ मार्च 2025 ला जागतिक महिला दिनानिमित्त पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवरी या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठवरे मॅडम, तथा उपाध्यक्ष दहिफळे मॅडम तथा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित lilhare मॅडम, शाळेतील प्राचार्य राजेंद्र मेश्राम सर त्यासोबतच उपस्थित डी. एम.कापसे सर, डी. व्ही. टेटे सर, एल एस लांजेवार सर, खंदारे सर, टी. ए. पिलारे सर, एन. एस. तांडेकर सर, के. एच. नाईक सर, कुधीर सर, कुंजाम सर,शहारे सर तसेच मा. Tekam बाबुजी, व सर्व विद्यार्थी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कापसे सर यांनी केले तसेच प्रमुख अतिथी राजेंद्र मेश्राम सर यांनी जागतिक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यासोबत दहिफळे मॅडम यांनी सुद्धा महिला दिनावर प्रकाश टाकला तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठवरे मॅडम यांनी सुद्धा अतिशय छान प्रकारे विद्यार्थ्यांना माहिती दिली. या प्रसंगी विविध वेषभूषा धारक विद्यार्थिनींनी लक्ष वेधले व काही विद्यार्थ्यानी गीत, कविता, भाषण सादर केले.
या कार्यक्रमाचे संचालन हर्षिका शेंडे व भार्गवी उईके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन टी. ए. पीलारे सर यांनी केले.#
(टिप:- या बातमी सोबत प्रमुख अतिथी राजेंद्र मेश्राम सर यांचे स्वागत करतांनी शाळेतील विद्यार्थिनी व मंचावर उपस्थित इतर मान्यवर शिक्षीका यांची फोटो पाठविली आहे.)