Home Uncategorized मालमत्ता व शेतपीक नुकसानीचे पंचनामे करुन मदत द्या : आमदार अग्रवाल

मालमत्ता व शेतपीक नुकसानीचे पंचनामे करुन मदत द्या : आमदार अग्रवाल

96
0

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काही गाव नदीकाठी असल्याने त्या भागात गेल्या 3 दिवसापासून संततधार येत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे शेतपिकाचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी यंत्रणेला दिले.सततधार पावसामुळे मध्यप्रदेश येथील संजय सरोवर, महाराष्ट्रातील पुजारीटोला व कालीसराळ या धरणाचे पाणी सोडल्याने पाण्याची पातळी वाढली असून वाघनदी व वैनगंगा नदीत पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे नदीकाठील परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांच्या धानपीकाला बसला असून अद्यापही शेतात पाणी साचले आहे. तसेच अनेक घरांची पडझड झालेली आहे. दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी पुरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून माहिती सादर करण्याची सुचना तलाठ्यांना दिली. तसेच नदीकाठी असलेले डांगोर्ली, मरारटोला, कासा, पुजारीटोला, बिरसोला आदी गावांचा दौरा संबधित अधिकारी व कर्मचार्‍यांसह करुन नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये या दृष्टीने काम करावे असे निर्देश आ. विनोद अग्रवाल यांनी दिले. यावेळी तहसीलदार शमशेर पठाण, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, जनता की पार्टीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष छत्रपाल तुरकर, रामराज खरे, कौशलबाई छत्रपाल तुरकर, अनंदा वाढीवा, ज्ञानचंद जमईवार, देवलाल मात्रे, अनिल मते, प्रशांत चौहान, बंटी तुरकर, धनीराम अंबुले, तुमन्ने सुरपत खैरवार, रमेश नागफासे, महेश रहांगडाले, अल्पसंख्यक आघाडी तालुकाध्यक्ष आशिफ शेख, रविन्द्र गडपायले, दशरथ पिपरेवार एवं संबधित गावातील तलाठी तसेच शेतकरी उपस्थित होते.