देवरी, (गोंदिया) : देवरी तालुक्यातील शिलापुर- पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुलियावरून पाण्याचा प्रवाह वाजवी पेक्षा जास्त होता. असे असताना सुद्धा ट्रॅक्टर चालकाने काहीही विचार न करता पुलावरून वाहणा-या पाण्यात टाकले आणि पाण्याच्या प्रवाहात पुलियाखाली चालकासह ट्रॅक्टर वाहून गेला. मात्र, चालकाला स्वतःचे जीव वाचविन्यात यश आले. ही घटना काल सोमवार, 22 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजे दरम्यान घडली. सविस्तर असे की, तालुक्यातील शिलापुर- पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुलीयावर सिरपुर/बांध येथील मनोहरसागर धरणाचे दरवाजे सुरु केल्याने पाण्याचा प्रवाह अधिक झाला. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना रोजंदारी शेतमजुर महिलांना सोडून वापसी होताना काहीही विचार न करता किंवा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात ट्रॅक्टर टाकले. पाण्याच्या प्रवाहाने ट्रॅक्टरसह चालक कृष्णा मारोती वलथरे (वय 30, रा. पदमपुर) नदीत वाहून गेला. मात्र चालकला स्वतःचा जीव वाचविण्यात यश आले. यात विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकाकडून कित्येक वर्षापासून नविन उंच पुलीया बांधकामाची मागणी करीत असतांना सुद्धा सारेच शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. करीता येथे तातडीने नविन उंच पुलियाचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

