Home Uncategorized एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये : पंकज रहांगडाले

एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये : पंकज रहांगडाले

127
0

गोंदिया : राज्य शासनाच्या वतीने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करून एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले. शनिवार, 6 जुलै रोजी गोरेगाव येथे पंचायत समितीच्या सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानथम, सभापती मनोजकुमार बोपचे, उपसभापती राजकुमार यादव, पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे गटविकास अधिकारी शुभम जाधव, सहा.गटविकास अधिकारी एच.व्ही.गौतम, जिल्हा परिषद सदस्य डा.लक्ष्मण भगत, शलेंद्र नन्देश्वर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय गणवीर, प्रीती कतलाम,चि त्ररेखा चौधरी, किशोर पारधी, सुप्रिया गणवीर, नालिनी सोनवाने, ताराम, बालविकास प्रकल्प अधिकारी अनविता श्रीवास्तव हे मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे संचालन रवी पटले व आभार सहाय्यक गटविकास अधिकारी एच.व्ही.गौतम. यांनी मानले.यशस्वितेकरिता शाखा अभियंता सेलुकर,विस्तार अधिकारी हरिनखेडे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी गावंडे, कनिष्ट अभियंता शेबेकर,विस्तार अधिकारी टी.डी.बिसेन यांनी सहकार्य केले.