Home Uncategorized शहरातील विविध समस्या मार्गी लावण्यात यावे

शहरातील विविध समस्या मार्गी लावण्यात यावे

138
0

शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्याँना निवेदन

गोंदिया : शहर राष्ट्रवादी कॉग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने खासदार प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरातील विविध समस्यांवर लक्ष केंद्रीत करून त्या मार्गी लावण्यासंबंधी न.प. चे मुख्याधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गोंदिया शहरातील रेलटोलीमध्ये असलेल्या नगर परिषद द्वारा निर्मित नाटयगृह लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. रेलटोली क्षेत्रामध्ये नवनिर्मित धोटे सुतिकागृहाच्या इमारतीचे उद्घाटन केव्हा करणार व त्या संबंधी लागणारे साहित्य व मनुष्यबळ यासंबंधी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. गोंदिया शहरातील नगर परिषदे द्वारा घनकचरा उचलण्याकरिता चालणारे ट्रॅक्टर व अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कचऱ्याची उचल होत नाही. त्यामुळे शहरात दुर्गंधी वाढून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुरेशा संख्याबळ वाढवून घन कचरा उचलण्यात यावा. गोंदिया शहरातील नाल्यांची मान्सुनपूर्व साफ सफाई करण्यात यावी. गोंदिया शहरात चालणाऱ्या घंटा गाड्यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने दुरुस्तीकरिता मेकॅनिकची संख्या वाढविण्यात यावी. गोंदिया शहरातील पार्वती घाट येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या निधीतून निर्मित शवदाहिनी सुरु करण्यास लागणारा मनुष्यबळ व जनरेटरची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी. नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील अनेक महिन्यांपासून वेतन अनियमित दिला जात असून कर्मचाऱ्यांचा वेतन नियमित देण्यात यावा. यासह शहरातील अनेक समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली व लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्यात येतील याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. निवेदन देतेवेळी नानू मुदलियार, विनीत सहारे, एकनाथ वहिले, विनायक शर्मा, राजेश दवे, महेश जोशी, नागो बन्सोड, लव माटे, हरिराम आसवानी, मंगेश रंगारी, राजू पाचे, बन्ना राव, श्रेयश खोब्रागडे सहित शहरातील अनेक कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.