Home आरोग्य मरारटोली येथे आरोग्य शिबीर संपन्न

मरारटोली येथे आरोग्य शिबीर संपन्न

42
0

नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र मरारटोलीच्या वतीने साईनगर मरारटोली येथे दि.27 फेब्रुवारी रोजी आरोग्याचा जागरातुन आरोग्य तपासणी शिबीरा दरम्यान नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.                    

नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र मरारटोलीच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्ह्णुन कार्यक्षेत्रातील नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीकोनातुन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे मरारटोलीचे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी बिसेन यांनी माहीती दिली आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक,वयोवृद्ध, महीला  यांचे तपासणी करण्यात आली.शिबिरामध्ये आरोग्य तपासणी,रक्त तपासणी,रक्तदाब, मधुमेह,हिमोग्लोबीन,सिकलसेल,क्षयरोग,कुष्ठरोग,मौखिक तपासणी,व्यसनावर मार्गदर्शन, सोबतच महालॅबच्या वतीने विविध प्रयोगशाळा चाचण्या मोफत करण्यात आल्या. त्याचबरोबर या शिबिरात आरोग्य विषयक सल्लाही देण्यात आला.

आपल्या रोजच्या आहाराचे नियोजन, आवश्यक आरोग्य चाचण्या व नियमित व्यायाम या गोष्टींचे मानवी जीवनातील महत्त्व वाढत असून प्रत्येकाला आपले आरोग्य सदृढ ठेवणे गरजेचे आहे.हल्ली ताणतणाव वाढला असून आजच्या धकाधकीच्या जीवनात रोगराईचे वाढते प्रमाण व आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी वेळोवेळी आवश्यक चाचण्या करून घेणे आवश्यक आहे.जेणेकरून वेळीच आजारांचे निदान होऊन त्यावर योग्य औषधोपचार करणे शक्य होत असल्याचे डॉ.पल्लवी बिसेन यांनी याप्रसंगी माहीती दिली.

शिबिरा दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी बिसेन,आरोग्य सेवक अंकुष बिसेन, आरोग्य सेविका सुनिता ठाकरे,महालॅब फ्लेबेटोमिस्ट खुशबु कनोजिया,परिचर राहुल देशमुख व कार्यक्षेत्रातील आशा सेविका यांनी आरोग्य सेवा दिली.