Home Uncategorized जिल्ह्यातील दिव्यांगांन करिता मोफत कृत्रिम अवयव शिबीर.

जिल्ह्यातील दिव्यांगांन करिता मोफत कृत्रिम अवयव शिबीर.

23
0

===================

■ गोंदिया पोलीस दल व रोटरी इंटरनँशनल क्लब नागपूर च्या वतीने या शिबीराचे आयोजन.

—————————-

गोंदिया,ता.०७:गोंदिया जिल्हा पोलीस दल , महाविर सेवासदन, अनवी इंडिया हयूमॅनीटी फाउंडेशन व रोटरी इंटरनॅशनल क्लब डिस्ट्रीक ३०३०, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने  “गोंदिया जिल्हा पोलीस दादालोरा खिडकी” या योजने अंतर्गत गोंदिया जिल्हयातील सर्व नागरिकांकरिता (विशेषतः नक्षलग्रस्त भागातील) आणि पोलीस दलातील अधिकारी/अंमलदार व त्यांचे कुटुंबियांमध्ये दिव्यांग असलेले व्यक्ती यांना कृत्रिम अवयव  सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता जयपूर फुट  मोफत कृत्रिम अवयव शिबीराचे दिनांक १५/०३/२०२५ ते १७/०३/२०२५ सकाळी ११.०० वा ते १७.०० वा पर्यंत पोलीस मुख्यालय, (कारंजा) गोंदिया जि. गोंदिया येथे  आयोजन करण्यात आले आहे.

             हे शिबीर  गोंदियाचे   पोलीस अधीक्षक, गोरख भामरे संकल्पनेतून आणि  गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा    (कॅम्प देवरी)   यांचे मार्गदर्शनाखाली नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी योजना चे माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात येत आहे…

              या शिबीराचे गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या कुटूंबांनी लाभा घ्यावा असे आव्हान  गोंदियाचे   पोलीस अधीक्षक, गोरख भामरे ,गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा    (कॅम्प देवरी),रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० चे, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रांजीदर खुराणा, डिस्ट्रिक्ट चेअर फार ट्रायबल वेलफेअर चे राजीव वरभे आणि संबधीत क्लबचे प्रातःपाल यांचे आदेशान्वे रोटरी क्लब ऑफ नागपूर पश्चिम चे सदस्य तथा  शासकीय माध्यमीक व उच्च माध्यमीक आश्रमशाळा तथा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शयल स्कुल बोरगाव चे माजी प्राचार्य डॉ. जगदीश बारसागडे यांनी केले आहे.

           अधिकच्या माहिती करीता रोटरी क्लब पश्चिम नागपूरचे सदस्य

डॉ. जगदीश बारसागडे, मो.नं. ८८०६५६५९७०,नक्षल प्रोपासेल गोंदिया चे महिला पो.हवालदार चेतना कटरे,मो.नं. ९६७३३९२७४६ आणि  नक्षल प्रोपासेल गोंदियाचे पो. अंमलदार भाष्कर हरिणखेडे, मो.नं.८९९९६२४२८१ यांच्याशी संपर्क करावे असे कळविण्यात आले आहे.#