देवरी,ता.२४: नगरपंचायत देवरीच्या सभापती पदाच्या निवडणुका आज सोमवार (ता.२४. फेब्रवारी) रोजी घेण्यात आल्या. त्यामध्ये संजु शेषलाल उईके स्थायी समिती अध्यक्ष (पदसिध्द) नगराध्यक्ष तथा पदसिध्द सभापती, प्रज्ञा प्रमोद संगीडवार सभापती, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती , उपाध्यक्ष, न.प. देवरी, आफताब अलताफ शेख सभापती, सार्वजनिक बांधकाम व पाणी पुरवठा समिती सभापती, संजय रतिराम दरवडे , अर्थ नियोजन आणि विकास, क्रिडा समिती सभापती , सिता प्रकाश रंगारी सभापती, महिला बालकल्याण व सांस्कृतीक कार्य समिती सभापती यांच्यावर्णी लागली आहे.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये पीटासीन अधिकारी म्हणून देवरीचे तहसीलदार महेंद्र गणवीर , मुख्याधिकारी करिश्मा वैद्य , कर अधिकारी आणि कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. यावेळी देवरी तालुका भाजपचे संपूर्ण पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
सदर निवडणुकीत कोणतेही मतदान न घेता निवडणूक बिनविरोध आणि शांततेत पार पडली.निवडणूक प्रक्रियेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली अकरा ते बारा वाजेपर्यंत समिती सभापती पदाचा अर्ज दाखल करणे
होते. त्यामध्ये सर्व सभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली.#

