देवरी,ता.२५:-स्थानिक छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे “आगाज ३.०” दोन दिवसीय वार्षिकोत्सवाचे दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोज शनिवारला श्री. निरज साबरी यांची “शाम-ए-सुरुर” कव्वाली नाईटच्या आयोजनासह थाटात समारोप करण्यात आले.
या दोन दिवसीय वार्षिकोत्सव “आगाज ३.०” चे उद्घाटन डॉ. श्री. मिलिंद उमेकर, प्रेसिडेंट, नेशनल ए.पी.टी.आय. प्राचार्य, एस.के.बी.काॅलेज ऑफ फार्मसी, कामठी यांच्या हस्ते तर अनिलकुमार येरणे सर, सचिव, कृ.स.तं.शि.सं., देवरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. डॉ. भुषणकुमार साठे, प्राचार्य, आय.पी.ई.आर., वर्धा, प्रा. डॉ. नितीन डुमोरे, प्राचार्य, डि.बी.सी.ओ.पी., नागपूर, जयश्रीताई येरणे, कोषाध्यक्षा, कृ.स.तं.शि.सं., देवरी, डॉ. उपदेश लाडे सर, प्राचार्य, सी.एस.सी.पी., देवरी मा. कु. शाजिया पठाण, एच.ओ.डी. या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनातून डॉ. मिलिंद उमेकर यांनी छत्रपती शिवाजी संकुलमध्ये शहरासारख्या उच्च स्तरीय भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी रिसर्च कामांवर लक्ष केंद्रित करून स्वतः ची प्रगती साधली पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिलकुमार येरणे यांनी देवरी सारख्या ग्रामीण भागात सव्वीस वर्षापूर्वी कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था नावाने लावलेले छोटेसे रोपटे आज विशाल वटवृक्षामध्ये रुपांतरीत झाले आहे व या वटवृक्षाखाली ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राथमिक ते उच्च तंत्रशिक्षणाच्या सोई मिळतात तसेच यावर्षीपासून नर्सिंगचे शिक्षण सुरु करण्यात आले आहे व पुढील सत्रापासून वैद्यकीय शिक्षणाची सोय सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. असे प्रतिपादन केले. याप्रसंगी “शब्दांकन” या मॅगझीनचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावर इंटर कॉलेजीएट डान्स कॉम्पिटिशन घेण्यात आले त्यामध्ये संपुर्ण विदर्भातील २१ संघानी सहभाग घेतला त्यापैकी श्री. सदगुरुदत्त काॅलेज ऑफ फार्मसी, कुही संघाने प्रथम क्रमांकाचे पुरस्कार ₹२५००० रोख व ट्रॉफी, एस.के.बी.काॅलेज ऑफ फार्मसी, कामठी संघाने द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार ₹१५००० रोख व ट्रॉफी तसेच अग्निहोत्री काॅलेज ऑफ फार्मसी, कामठी संघाने तृतीय क्रमांकाचे पुरस्कार ₹१०००० रोख व ट्रॉफी पटकावली.
या कार्यक्रमाचे संचालन अधिव्याख्याता चंद्रशेखर बडवाईक व कु. पायल खंडाईत यांनी तसेच आभारप्रदर्शन कु. रिता सोयाम यांनी केले. एकंदरीत या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यात कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.#
(टिप:- या बातमी सोबत पुरस्कार वितरण करतांनी प्रमुख मान्यवरांची फोटो पाठविली आहे.)


