Home Uncategorized मंडल यात्रेचा समारोप कार्यक्रम आज; प्रा. लक्ष्मण यादव गोंदियात

मंडल यात्रेचा समारोप कार्यक्रम आज; प्रा. लक्ष्मण यादव गोंदियात

77
0

गोंदिया : दरवर्षीप्रमाणे नागपूर येथून निघत असलेल्या मंडल यात्रेचा समारोप बुधवार, 7 ऑगस्ट रोजी गोंदियाच्या ग्रीन लॅंड लाॅन बालाघाट टी पॅाईंट गोंदिया येथे होणार आहे. त्यानिमित्ताने ओबीसी, व्हीजेएनटी, एसस्सी, एसटी, मायनारिटी समाजाकरीता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडल यात्रा जनजागृती कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघ गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रा. बी.एम. करमकर राहणार आहेत. तर मुख्य वक्ते म्हणूनओबीसी बहुजन विचारवंत नवी दिल्ली विद्यापाीठाचे प्रा. लक्ष्मण यादव तसेच ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. प्रदिप ढोबळे, ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोर्राम, दिनानाथ वाघमारे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात तत्कालीन भंडारा जिल्हा असताना 26 जुलै 1998 मध्ये ओबीसी संघटनेच्या सुरवातीच्या काळात चळवळीत सहभागी होत गावखेड्यापर्यंत ओबीसी संघटना व विचार पोचविणार्यामध्ये पुढे असलेल्या ओबीसी शिलेदारांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या सत्कारमुर्ती मध्ये विनोद चव्हाण बोथली, रमेश ब्राम्हणकर गोंदिया, माधवराव फुंडे नोनीटोला, कृष्णा बहेकार आसोली, चौकलाल येडे चांगोटोला, प्रा. राजेंद्र पटले तिरोडा, उमाशंकर ठाकूर चुलोद, एकनाथ साठवणे झांजिया, उध्दव मेहंदळे इटखेडा, प्रेम साठवणे ठाणा तसेच मरणोपंरात स्व.पेमेंद्र चव्हाण यांचा समावेश असल्याची माहीती ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी एसस्सी, एसटी समाज संघटनेच्यावतीने करण्यत आले आहे.