Home Uncategorized सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सर्व प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्यात येणार : राज्याध्यक्ष जंगम

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सर्व प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्यात येणार : राज्याध्यक्ष जंगम

75
0

जिल्हा अधिवेशन व सत्कार समारंभ थाटात

गोंदिया : गोरगरीब, आजारी, वयोवृध्द सेवानिवृत्त शिक्षकांच्या तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न जिल्हा प्रलंबीत आहेत. त्यापैकी काही प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविले आहेत, तर उर्वरित प्रश्न मंत्रालयात जावुन सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी आपण असेच संघटेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे मत म.रा. सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांनी व्यक्त केले.

सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा अधिवेशन व सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते पं.स. सभापती मनुेश रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून संघटनेचे राज्याध्यक्ष गोंदिया जिल्हाच्या जिल्हा अधिवेशनात मुख्य मधुकर जंगम, प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.यु.एल. यादव, मार्गदर्शक मनोजकुमार दिक्षित, राज्य प्रतिनिधी पी.आर. पारधी, गट शिक्षणाधिकारी पी.पी.समरीत, जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे, मार्गदर्शक आर.आर. अगडे, टी.बी. भेडारकर, डी.एल. गुप्ता व जिल्हा सचिव पी.एन. बडोले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला मार्त्यापण व दिप प्रज्वलीत करुन करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. प्रास्ताविकातून संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे यांनी सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय समस्या मांडल्या व गोंदिया जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी आतापर्यंत काय केले, यावर प्रकाश टाकला. राज्याध्यक्ष जंगम यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, असे व्यक्त केले. तसेच गोंदिया जिल्हा संघटनेतर्पेâ आयोजित अभूतपूर्व जिल्हा अधिवेशन आयोजित केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष एल.यु. खोब्रागडे व संघटनेच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी सभापती मुनेश रहांगडाले यांनी गोंदिया पंचायत समिती स्तरावर असलेल्या प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर संघटनेच्या वतीने 75 वर्षावरील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पी.बी. लांजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डी.एल. गुप्ता यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.ई. येळे, ओ.के. बन्सोड, एम.एन. उदापुरे, रेखा बोरकर, मनूताई उके, बी.जी. येरणे, गिता दोनोडे, संजय पराडकर, सुरेश आष्टीकर, आर.के ठाकरे, पी.एल.पारधी, डी.एन. गोलीवार, विजयमाला पोहरकर, डी.एम. दखने, रमेश गहाने, के.डी. चौधरी, आर.एस. राहांगडाले, एच.आर. चन्ने, एन.डी. कारंगेकर, मेघनाथ वाघाडे, जिओंकार कन्हाडे, एस.एन. शिवणकर, एस.एम. येळे, एच.पी. पटले, डी.बी. चौधरी, ए.बी. बोरकर, सरस्वता शहारे, पंचशीला रामटेके, अंजली ब्राम्हणकर, मंजुश्री बोरकर, भुमेश्वरी नांदणे, रंजना डोंगरे, टी.एन. बहेटवार, आर.के. बोरकर, पी.बी. शहारे, आर.एस. वानखेडे, एस.एस. डोये, श्रीकृष्ण निशाने, श्रीकृष्ण कोरे, आर.के. बोरकर मोठा प्रमाणात सेवानिवृत्त शिक्षक कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न लावणार : आमदार अग्रवाल

सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे तालुका, जिल्हास्तरावर अनेक प्रश्न व समस्या प्रलंबित आहेत. या संदर्भात संघटनेकडून आपल्याला माहिती देण्यात आली आहे. समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी बैठक घेवून चर्चा करणार. तसेच आगामी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सर्व प्रलंबीत प्रश्न मार्गी लागणार, याची काळजी घेणार, अशी ग्वाही गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली.