दि. 28 फेब्रुवारी रोजी राजस्थान मधील अजमेर येथे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर वय वर्ष 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण मिळण्यासाठी मोहिमेचा शुभारंभ केला.
दि.28 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे जनआरोग्य समितीची सभा संपन्न झाली.सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी ‘एचपीव्ही’ लसीकरणाची जनजागृती करुन कार्यक्षेत्रातील 100 टक्के मुलींनाएचपीव्ही लसीकरण मिळण्याच्या दृष्टीकोनातुन जनआरोग्य समितीच्या पदाधिकारींनी जनजागृती करण्याचा ठाम निर्धार केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर,जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते,सभापती पंचायत समीती अर्जुनी मोरगाव आम्रपाली डोंगरवार,सरपंच गोठणगाव संजय ईश्वार,उपसरपंच गोठणगाव कांतीलालजी डोंगरवार,उपसरपंच रामनगर संतोष मिर्धा,माजी जिल्हा परिषद सदस्य रतिरामजी राणे,सामाजिक कार्यकर्ता प्रतापगड सौरभजी पशिने,समिती सदस्य अशोकजी कापगते,कृष्णाजी मांडवे,डॉ.कमल सरकार,वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कविश्वर किरसान उपस्थित होते.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला दूर करण्यासाठी ज्या मुलींचे 14 वर्ष पुर्ण झाले आहे परंतु 15 वर्ष पुर्ण होण्यास आहे म्हणजेच 14 ते 15 वर्ष वयोगटातील असे मुलींचे एचपीव्ही लसीकरण होणार आहे.लसीकरण केल्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा धोका टाळता येणार असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र घरतकर यांनी यावेळी दिली.
सभेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.खोब्रागडे व स्नेहा कापगते,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत खरात,फार्मासिस्ट मुकुल बडवाईक,समुदाय आरोग्य अधिकारी गौरव टेंभेकर व तृप्ती गहाणे,आरोग्य सहाय्यक संतोष पारधी व किशोर कुर्वे,आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर, आरोग्य सेवक अमोल मालेकर व समीर सैय्यद,आरोग्य सेविका शामकला नहामुर्ते, अर्चना शेंडे,निराशा शहारे, प्रमिला रॉय,कोमल पडोळे, यमुना मानापुरे व शशिकला कोडाप, स्टाफ ब्रदर चिरायु वावरे,आशा गट प्रवर्तक दिक्षा रंगारी व रिना टेंभुर्णे,परिचर प्रभु उईके, बंडु उके, सफाईगार कुमुद शहारे व डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रजय कर्हाडे उपस्थित होते.
‘एचपीव्ही‘ लसीकरण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे.14 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींनी लसीकरण केल्यास भविष्यात संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.लसीकरणाबाबत भीती न बाळगता पालकांनी पुढाकार घ्यावा. यामुळे मुलींचे आरोग्यविषयक भविष्य सुरक्षित होवु शकते.
– यशवंतजी गणवीर, जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया
भारतात महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे, ज्यामुळे दरवर्षी हजारो महिलांचा मृत्यू होतो.एचपीव्ही लस या कर्करोगाचा धोका कमी करू शकते.वयाच्या 9 ते 14 वर्षांच्या दरम्यान ही लस घेणे सर्वाधिक प्रभावी मानले जाते, कारण लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. भारत सरकारद्वारे 14 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी विशेष मोफत लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा.
– आम्रपाली डोंगरवार, सभापती पंचायत समीती अर्जुनी मोरगाव



